Rohit Pawar on MLA Santosh Bangar । शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर नेहमीच त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. अशात पुन्हा एकदा शाळेतील मुलांना अजब सल्ला दिल्यामुळे ते चर्चेत आले आहे. संतोष बांगर यांनी हिंगोलीतील एका शाळेत विद्यार्थ्यांना अजब सल्ला दिलाय.
व्हिडिओमध्ये संतोष बांगर म्हणत आहे की,’तुमचे आई-वडील येत्या निवडणुकीत मला मतदान करत नसतील तर दोन दिवस जेवू नका. तसेच बांगर यांनी चिमुकल्या मुलांकडून वदवून घेतलं की, ते त्यांच्या आई-वडिलांसमोर काय बोलणार? कोणाला मतदान करायला लावणार? अस चिमुकल्यांकडून त्यांनी वदवून घेतले आहे. संतोष बांगर यांनी विद्यार्थ्यांना दिलेला हा अजब सल्ला सध्या सोशलवर चांगलाच व्हायरल होत आहे.
हेही वाचा
kareena kapoor khan। करीनाच्या लेकाला फुटबॉलपटू लियोनार्डो मेस्सीसारखा व्हायचे
यावर आता विरोधकांकडूनही टीका होत आहे, अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी ट्विट करत आमदार संतोष बांगरांविरुद्ध कारवाई करा अशी मागणी केली आहे.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार
यांना मतदान करण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दोन दिवस जेवायचं नाही म्हणजे हे काय महात्मा आहेत का? यांनी लहान मुलांच्या शिक्षणासाठी मतदारसंघात काय दिवे लावले? लहान मुलांचा राजकारणासाठी वापर करणं हा गुन्हा असून याबद्दल या आमदार महाशयांवर कारवाई झाली पाहिजे!
यांना मतदान करण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दोन दिवस जेवायचं नाही म्हणजे हे काय महात्मा आहेत का? यांनी लहान मुलांच्या शिक्षणासाठी मतदारसंघात काय दिवे लावले? लहान मुलांचा राजकारणासाठी वापर करणं हा गुन्हा असून याबद्दल या आमदार महाशयांवर कारवाई झाली पाहिजे! pic.twitter.com/eF5a193BDW
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 10, 2024
हेही वाचा
MLA Santosh Bangar। ‘तुमच्या आई बापाला मला मतदान करायला लावा नाही तर दोन दिवस जेवू नका’