गृहमंत्र्यांनी वृत्तपत्र छायाचित्रकरांचा विशेष संदेश केला शेअर
पुणे – सध्या देशभरात करोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस करोनाबाधितांची रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढतच आहे. याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. अशातच डॉक्टर, पोलीस, पत्रकार आणि सफाई कर्मचारी सारखे रिअल हिरो आपल्या जीवाची पर्वा न करता करोनाविरोधात लढत आहेत. त्यांचे कार्य तुमच्यासमोर आणण्यासाठी पडद्यामागील नायक झटत आहेत ते म्हणजे वृत्तपत्र छायाचित्रकार.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज आपल्या ट्विटरवर वृत्तपत्र छायाचित्रकारांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ते म्हणाले कि, करोनामुळे चालू असलेल्या लॉकडाऊनमधील अद्यावत माहितीसाठी पत्रकारांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार्या वृत्तपत्र छायाचित्रकारांनी आपल्या सर्वांसाठी दिलेल्या संदेशाला इथे शेअर करत आहे. नक्की बघा आणि हो विसरू नका, घरात रहा सुरक्षित रहा, असा संदेश दिला आहे.
#Covid19 मुळे चालू असलेल्या लॉकडाऊन मधील अद्यावत माहिती साठी पत्रकारांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार्या वृत्तपत्र छायाचित्रकारांनी आपल्या सर्वांसाठी दिलेल्या संदेशाला इथे शेअर करत आहे. नक्की बघा आणि हो विसरू नका, घरात रहा सुरक्षित रहा.#StayHomeStaySafe#WarAgainstVirus pic.twitter.com/7Q6dWGysyt
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 24, 2020
दरम्यान, राज्यात गुरुवारी करोनाचे ७७८ नवे रुग्ण सापडले असून आतापर्यंतची ही सर्वात मोठी संख्या आहे. यासोबत राज्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या सहा हजारावर पोहोचली आहे. राज्यात सध्या ६४२७ करोनाबाधित रुग्ण आहेत. तर मृत्यू झालेल्यांची संख्या २८३ आहे. गुरुवारी १४ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ८४० रुग्णांना उपचार करुन घरी सोडण्यात आलं आहे.