सध्याच्या काळात सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरवर #ravanontwitter ट्रेंड करत आहे. यामागचे प्रमुख कारण म्हणजे रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेतील रावणाची भूमिका वठवणारे अरविंद त्रिवेदी यांची सोशल मीडियातील एंट्री कारणीभूत आहे. अर्थात त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. कारण अरविंद त्रिवेदी नावाने अनेक खाते आहेत.
अशा स्थितीत खरे खाते कोणते, ते सांगता येणार नाही. त्यामुळे आता यूजर ट्विटरवर रावण ऑनट्विटरबरोबर ट्विट करत आहेत. यात श्रोते गमतीजमती देखील करत आहेत. काही जण वेगवेगळे मीम रिलीज करत आहेत. काही जण त्यास अरुण गोविल यांनाही जोडत आहेत. कारण अलीकडेच अरुण गोविल यांचे ट्विटर अकाऊंट व्हेरिफाय करण्यात आले. अर्थात या खात्यावरून पहिले ट्विट केले गेले. त्यात म्हटले की, माझ्या मुलांनो आपल्या प्रेमापोटी मी ट्विटरशी जोडलो गेलो आहे. हे माझे मुळ खाते आहे. जो यूजर 18 एप्रिलपासून #ravanontwitter रीट्विट करेल, त्याला मी लगेचच फॉलो करेल. जय श्रीराम. ओम नम: शिवाय. या ट्विटनंतरच यूजर हे रावण ऑन ट्विटरबरोबर ट्विट करत आहेत.