पुणे – दिलीप (अण्णा) वेडेपाटील व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) व केपीआयटी संलग्नतेने आयोजित तिसऱ्या 12 व 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप ब्रॉन्झ सिरीज मानांकन टेनिस 2020 स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत अद्विक नाटेकर, अभिराम निलाखे, अर्जुन कीर्तने, आदित्य भटेवरा यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
दिलीप वेडेपाटील स्पोर्टस अकादमी, बावधन येथील टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या
स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित अद्विक नाटेकरने सहाव्या मानांकित अर्णव बनसोडेचा 6-4 असा तर दुसऱ्या मानांकित आदित्य भटेवराने आठव्या मानांकित स्पर्श मुर्गेचा 6-2 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. सातव्या मानांकित अर्जुन कीर्तने याने चौथ्या मानांकित दिव्यांक कवितकेचा 6-4 असा तर तिसऱ्या मानांकित अभिराम निलाखेने प्रणव इंगोलेचा 6-4 (1) असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. मुलींच्या गटात उप-उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित जुई काळेने अस्मी मोरेचा 6-0 असा सहज पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. श्रावणी देशमुखने सानिका लुकतुकेचा 6-2 असा पराभव केला.
12 वर्षाखालील मुलांच्या गटात दुसऱ्या फेरीत बिगर मानांकित अथर्व येलभरने सहाव्या मानांकित अनुराग पाटीलचा 6-2 असा पराभव करत उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सातव्या मानांकित वैष्णव रानवडेने दर्श सोलंकीचा 6-2 असा तर तिसऱ्या मानांकित रियान मुजगुले याने शौनक रणपिसेचा 6-4 असा पराभव करत उप-उपांत्यपूर्व फेरी गाठली. पाचव्या मानांकित क्रिशांक जोशीने रोहन बजाजचा 6-2 असा पराभव केला. मुलींच्या गटात पहिल्या फेरीत वैभवी चिक्कमतने मनस्वी वाकोडेचा 6-4 असा तर हंसिका सुंदरमने परी हेंगलेचा 6-1 असा पराभव करत आगेकूच केली.