PMDTA RANKING YOUNIRISE TENNIS ACADEMY TROPHY : पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे पीएमडीटीए मानांकन योनराईज टेनिस अकादमी करंडक १२ व १४वर्षाखालील टेनिस स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलींच्या गटात नक्षत्रा अय्यर, रिशीता पाटील यांनी मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
पाषाण सुस रोड येथे योनराईज टेनिस अकादमी टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलींच्या गटात उप-उपांत्यपूर्व फेरीत बिगरमानांकीत नक्षत्रा अय्यरने आठव्या मानांकित नवल शेखचा ६-० असा एकतर्फी पराभव केला. रिशीता यादव हिने दुसऱ्या मानांकित वाण्या अगरवालचा टायब्रेकमध्ये ६-४(४) असा पराभव करून अनपेक्षित निकालाची नोंद केली.
अव्वल मानांकित अयाती तुडयेकरने स्वर्णिका ढमालेचा ६-१ असा तर, सहाव्या मानांकित श्रीया रांजळकरने सान्वी गोसावीचा ६-२ असा पराभव करून आगेकूच केली. चौथ्या मानांकित शरण्या सावंतने भाव्या सोनकरला ६-४ असे नमविले.
IPL 2024 : प्रतीक्षा संपली…! अखेर उर्वरित आयपीएल सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, लोकसभा निवडणुकीमुळे…
१४ वर्षाखालील मुलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत नीरज जोर्वेकर, मिहित पवार, विवान मल्होत्रा, आश्रित मज्जी यांनी, १२ वर्षाखालील मूळच्या गटात अहान जैन, रेयांश गुंड, कीर्थन सुजित, हर्ष नागवानी यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.