… तर पाणक्या झालो असतो
नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन याने महेंद्रसिंग धोनी व स्टिफन फ्लेमिंग यांचे आभार मानले आहेत. सुरवातीच्या काही सामन्यात सुमार कामगिरी झाल्यानंतरही धोनी व फ्लेमिंग यांनी माझ्यावर विश्वास ठेवला व मला सातत्याने संधी दिली त्यामुळेच मला आत्मविश्वास मिळाला व माझी कामगिरी चांगली झाली, अन्यथा मला मैदानावर पाणी घेउन जाणारा पाणक्याच बनून रहावे लागले असते अशा शब्दात वॉटसनने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये चेन्नई संघातून खेळताना मला सुरवातीच्या काही सामन्यात सातत्याने अपयश येत होते. नेटमध्ये सराव योग्य प्रकारे होत होता मात्र, प्रत्यक्ष मैदानावर कामगिरी होत नव्हती. तरीही कर्णधार धोनी व प्रशिक्षक फ्लेमिंग यांनी मला सातत्याने प्रोत्साहन दिले तसेच तूला संघातून बाहेर ठेवणार नाही. कोणतेही दडपण न घेता खेळ असा पाठिंबा दिला व त्यानंतर माझी कामगिरी सातत्यपूर्ण होत गेली. केवळ त्यांनी विश्वास दाखविला म्हणून अन्यथा मैदानावर खेळत असलेल्या माझ्याच सहकारी खेळाडूंना पाणी नेऊन देणारा पाणक्या हीच माझी कामगिरी झाली असती. धोनी व फ्लेमिंग यांचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही, असेही वॉटसन म्हणाला.
चेन्नईच्या संघात 10 सामन्यात तुम्ही चांगली कामगिरी न करताही तुम्हाला पुढील सामन्यात संधी मिळते. गेल्या वर्षी माझी कामगिरी चांगली झाली नव्हती, पण कर्णधार धोनी आणि प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. इतर कोणत्याही दुसऱ्या संघात असतो, तर थेट संघाबाहेरचा रस्ता दाखवला असता आणि इतर खेळाडूंना पाणी नेण्यासाठी सांगितले असते, असे वॉटसनने सांगितले.