Bollywood News । भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू हार्दिक पांड्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत एक धक्कादायक बाब समोर येत आहे. हार्दिक आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.
सोशलवर ‘नताशा आणि हार्दिक वेगळे झाले आहेत का?’, अशी एक पोस्ट व्हायरल होत आहे. हा फक्त एक अंदाज आहे. दोघेही एकमेकांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत नाहीत. याआधी नताशाच्या इन्स्टाग्रामवर नताशा स्टॅनकोविक पांड्या असे लिहिले होते, पण आता तिने हे आडनाव काढून टाकले आहे. यावरून चाहते आता ते वेगेळे होणार असल्याचा अंदाज लावत आहे,
4 मार्चला त्याचा वाढदिवस होता आणि त्या दिवशी हार्दिकने काहीही पोस्ट केले नाही. तर नताशाने स्वतःचे आणि हार्दिकचे सोशल मीडिया फोटोही काढले आहे. याशिवाय, तो स्टेडियममध्ये किंवा या आयपीएलमधील संघाबद्दल कोणतीही कथा पोस्ट करताना दिसला नाही. हार्दिक आणि नताशाबाबत सोशलवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहे.
दरम्यान, या जोडप्या या चर्चांवर अधिकृतरित्या कुठलीही माहिती दिलेली नाही. नताशा आणि हार्दिक पांड्या यांचा विवाह 31 मे 2020 रोजी झाला होता आणि त्याच वर्षी 30 जुलै रोजी त्यांचा मुलगा अगस्त्यचा जन्म झाला होता.