नवी दिल्ली – स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने करोनाचा धोका असतानाही सोशल डिस्टंसिंगला हरताळ फासत चक्क सराव केला. त्याच्या या कृतीवर चाहतेच नाही तर सर्वसामान्य लोकांनीही संताप व्यक्त केला आहे. लॉकडाऊन असतानाही त्याने एकत्रित सराव केल्याने चाहत्यांनीही त्याच्यावर टीका केली आहे.
पोर्तुगालचा स्टार खेळाडू व सर्वात श्रीमंत खेळाडू असलेल्या रोनाल्डोने मेडीरा नॅशनल स्टेडियमवर सराव केला. त्याला कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही, हे मैदान व्यवस्थापनाने स्पष्ट करत रोनाल्डोलाच लक्ष्य केले. करोना विषाणूंचा धोका दिवसेंदिवस वाढत असताना रोनाल्डोचे हे वर्तन कोणलाही पसंत पडलेले नाही.