पुणे – रिक्षात विसरलेली ज्येष्ठ नागरिकाची पैशाची बॅग गस्तीवरील पोलिसांनी परत मिळवून दिली. औंध येथे डॉक्टर शशिकांत निवसरकर (वय 73) हे शुक्रवारी 11:40 वाजण्याच्या सुमारास टिळक पुतळा येथून रिक्षाने बोहरी आळी येथे खरेदीसाठी गेले व त्याच रिक्षाने परत मंडई येथे आले.
त्यांची रोख रक्कम तीन लाख असलेली बॅग रिक्षात विसरले. याबाबत आम्हास माहिती दिली असता आम्ही मंडई मार्शल वरील पोलीस नाईक 9767 मोरे व पोलीस अंमलदार 9146 गद्दे असे टिळक पुतळा या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले.
सदर रिक्षाचा क्रमांक (MH 12 GS 5551) असा असल्याचे दिसून आले. सदर रिक्षा क्रमांक वरून रिक्षाचा शोध घेतला असता सदरची रिक्षा ही रामेश्वर चौक येथे मिळून आली. तसेच श्री निवसरकर यांची तीन लाख रोख रक्कम असलेली बॅग सुद्धा मिळाली. श्री निवसरकर यांनी पुणे पोलीसांविषयी कृतज्ञता व्यक्त करून मंडई पोलिस चौकीचे पोलीस हवालदार साबळे मंडई मार्शल वरील पोलीस नाईक मोरे व पोलीस अंमलदार गद्दे यांचे आभार मानले.