पुणे – घरफोडी करुन दोन लाख पाच हजाराचा कॅमेरा चोरणाऱ्यास येरवडा पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून चोरीचा कॅमेरा हस्तगत करण्यात आला. विशाल उर्फ कान्हया संपती चंदनशिवे(18,रा.विश्रांतवाडी) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार येरवडा परिसरात घरात खुर्चीवर ठेवलेला निकॉन कंपनीचा कॅमेरा चोरल्याचा गुन्हा दाखल होता. संबंधीत गुन्हयाचा तपास करताना पोलीस नाईक अमजद शेख यांना खबर मिळाली की, कॅमेरा चोरलेला विशाल चंदनशिवे हा मेंटल कॉर्नरजवळ उभा आहे.
त्यानूसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याला पोलिशी खाक्या दाखवताच त्याने चोरीची कबुली दिली. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख, पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे, पोलीस हवालदार गणपत थिकोळे, पोलीस अंमलदार अमजद शेख, गणेश वाघ, अनिल शिंदे, सुनिल सकट, समीर भोरडे, संजय भरगुडे, अजय पडोळे, गणेश शिंदे यांच्या पथकाने केली.