भारताने मोडला नकोसा ‘वर्ल्ड रेकॉर्ड’; पाहा ही चिंताजनक आकडेवारी

नवी दिल्ली – करोनाबाधितांची वेगाने वाढणारी संख्या मोठ्या चिंतेचा विषय बनला असतानाच भारताने गुरूवारी एक नकोसा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला. एका दिवसात देशात तब्बल 3 लाख 14 हजार 835 नवे करोनाबाधित आढळले. तो जगातील आजवरचा उच्चांक ठरला आहे.

संपूर्ण जगाला ग्रासलेल्या करोना संकटाचा सर्वांधिक फटका अमेरिकेला बसला आहे. त्या देशात 8 जानेवारीला 3 लाखांपेक्षा अधिक नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. तो जागतिक विक्रम ठरला. मात्र, भारताने तो विक्रमी आकडा ओलांडला. करोना संसर्गाने भारतात एकाच दिवशी 2 हजार 104 बाधित दगावले. ते प्रमाणही देशातील सर्वोच्च ठरले आहे.

भारतातील करोनाबाधित संख्येने 19 एप्रिल या दिवशीच दीड कोटीचा टप्पा पार केला. देशात आतापर्यंत 1 लाख 84 हजार 657 बाधित मृत्युमुखी पडले आहेत. देशात करोनाबाधित आणि करोनामृत्यू संख्येत महाराष्ट्र सर्वांत वरच्या स्थानी आहे.

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह 10 राज्यांत मोठ्या प्रमाणात करोनाबाधित वाढत आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रापाठोपाठ उत्तरप्रदेश आणि दिल्लीचा क्रमांक लागतो. त्याशिवाय, गुजरात, कर्नाटक, केरळ, छत्तिसगढ, मध्यप्रदेश, बिहार आणि राजस्थानमधील बाधितांची संख्याही लक्षणीय प्रमाणात वाढत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.