बारामती (प्रतिनिधी) : बारामती शहर सीलबंद असताना देखील शहरात सुप्रसिद्ध असलेली राजापुरी भेळीची चव बारामतीकरांना चाखता येणार आहे. बारामती पॅटर्न नुसार राजापुरी भेळची होम डिलिव्हरी देण्यात येत आहे.
शहरात भीलवाडा तसेच बारामती पॅटर्न अवलंबला जात आहे. त्यामुळे नागरिक घराबाहेर पडू शकत नाहीत. मात्र नागरिकांना लागणारे जीवनावश्यक साहित्य घरपोच देण्यासाठी यंत्रणा कार्यन्वित करण्यात आली आहे.
स्वयंसेवक तसेच दुकानदारांच्या माध्यमातून मागणीनुसार घरपोच साहित्य दिले जात आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत नाही. बारामती शहरात सुप्रसिद्ध असलेली राजापुरी भेळ देखील घरपोच देण्यात येत आहे. त्यामुळे घरात राहून देखील राजापुरी भेळीची आस्वाद बारामतीकरांना घेता येणार आहे.
“बारामती शहर सीलबंद आहे. जीवनावश्यक असणारे साहित्य नागरिकांना घरपोच दिले जात आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार राजापुरी भेळ देखील घरपोच दिली जात आहे. प्रशासनाच्या आदेशाचे पालन करत योग्य खबरदारी घेऊन सुरक्षित अंतर ठेवून राजापुरी भेळ घरपोच दिली जात आहे. दुपारी तीन ते रात्री आठ या वेळेत होम डिलिव्हरी दिली जात आहे.”
– राजाभाऊ शेख, (राजापुरी भेळ,बारामती)