नवी दिल्ली – करोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व क्रीडास्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या असून काही रद्दही करण्यात आल्या आहेत. त्यातच आता राष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाने येत्या जूनमध्ये बेंगळुरूत होणारी राष्ट्रीय आंतरराज्य अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा म्हणूनच यातील कामगिरी खेळाडूंसाठी महत्त्वाची मानली होती.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व क्रीडास्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या असून काही रद्दही करण्यात आल्या आहेत. त्यामुळेच महासंघाने ही स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
आधीच्या वेळापत्रकानुसार ही स्पर्धा येत्या 25 ते 28 जून या कालावधीत होणार होती. ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा म्हणूनच यातील कामगिरी खेळाडूंसाठी महत्त्वाची मानली होती.