बॉलीवूडची अभिनेत्री कंगना राणावत नेहमीच आपल्या बेधडक आणि स्पष्ट वक्तव्यांमुळे चर्चेत असते. अलीकडेच तिने एक खुलासा केला आहे. संजय दत्त याच्या जीवनावर आधारित “संजू’ या चित्रपटासाठी आपल्याला विचारणा झाली होती.
View this post on Instagram
दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी दिलेला हा प्रस्ताव आपण नाकारला होता, असे कंगनाने सांगितले आहे. या चित्रपटाने जगभरात 600 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.
याबाबत एका मुलाखतीत बोलताना कंगना म्हणाली की, संजू चित्रपटातील भूमिकेसाठी रणबीर कपूर माझ्या घरी आला होता. पण मला ती भूमिका-व्यक्तिरेखा विशेष आवडली नाही.
कारण त्यामध्ये करण्यासारखे मला काहीच नव्हते. तसेच मला “सुलतान’साठीही ऑफर आली होती. पण त्यासाठीही मी नकार दिला, असे कंगना सांगते.
View this post on Instagram
कंगना पुढे सांगते की, यानंतर आदित्य चोप्राने मला फोन केला होता आणि यापुढे मी तुझ्यासोबत काम करणार नाही असे सांगितले होते. कंगना आणि तिची बहीण रंगोली चंदेल सातत्याने रणबीर कपूरची गर्लफ्रेंड आलिया भट्टवर निशाणा साधत असतात.