लंडन – आपण ज्या ग्रहावर राहातो त्याला पृथ्वी म्हणतात. ती गोल आहे असेही सांगितले जाते मात्र, खरेतर पृथ्वी संपूर्ण गोल नाही तर कांद्याच्या पातीसारखी दोन्ही बाजुला थोडीशी गोलाकार आहे, असा शोध इंग्लंडचा माजी कसोटीपटू व अष्टपैलु क्रिकेटपटू ऍण्ड्रयु फ्लिण्टॉफ याने लावला आहे.
करोनाच्या संकटामुळे सध्या घरातच राहावे लागल्याने अनेक खेळाडूंना मानसिक आजाराने ग्रासल्याच्या बातम्या कानावर येत असून आता फ्लिण्टॉफला देखील मानसिक आजार झाला आहे का त्याला होमफोबिया झाला आहे असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे.
पृथ्वीचा आकार पॅनकेकसारखा आहे असे सांगितल्यामुळे पूर्वी एका शास्त्रज्ञाला फाशीची शिक्षा देण्यात आली होती. पृथ्वी खरेच गोल आहे का हा वाद गेल्या कित्येक वर्षांपासून सातत्याने होतानाही दिसलेला आहे. पृथ्वी ही गोलाकार आहे हे सर्वमान्य आहे. मात्र, ती पूर्ण गोलाकार नसून कांद्याच्या पातीमधील कंदमुळासारखी आहे, असे सांगून फ्लिण्टॉफने आपल्यालाही मानसिक उपचारांची गरज असल्याचे दाखवून दिले आहे.