IPL 2024 (Virat Kohli, RCB vs GT Match 52) : आयपीएल 2024 चा 52 वा सामना चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एकतर्फी विजय मिळवला. या विजयासह आरसीबी प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या बॅटमधून या सामन्यात शानदार खेळी पाहायला मिळाली. त्याचवेळी त्याने आयपीएलमध्ये असा पराक्रमही केला जो यापूर्वी कोणीही करू शकले नव्हते.
विराट कोहलीने रचला इतिहास …
विराट कोहलीने या सामन्यात 27 चेंडूत 42 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 2 चौकार आणि 4 षटकार मारले. विराटच्या या खेळीमुळे संघाने 4 गडी राखून विजय मिळवला. यासह विराट कोहलीने आयपीएलमधील विजयी सामन्यांमध्ये 4 हजार धावा पूर्ण केल्या. विशेष म्हणजे विजयी सामन्यांमध्ये 4 हजार धावा करणारा विराट कोहली आयपीएलच्या इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे. याआधी कोणताही खेळाडू या स्थानापर्यंत पोहोचू शकला नव्हता.
आयपीएलमध्ये जिंकलेल्या सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज…
4 हजार 039 धावा – विराट कोहली*
3 हजार 945 धावा – शिखर धवन
3 हजार 918 धावा – रोहित शर्मा
3 हजार 710 धावा – डेविड वॉर्नर
3 हजार 559 धावा – सुरेश रैना
टी20 फॉरमॅटमध्ये गाठला विशेष टप्पा….
विराट कोहलीने या खेळीत आपल्या टी-20 कारकिर्दीत 12500 धावांचा आकडाही गाठला. T20 क्रिकेटमध्ये 12500 किंवा त्याहून अधिक धावा करणारा विराट चौथा खेळाडू ठरला आहे. याआधी केवळ ख्रिस गेल, शोएब मलिक आणि किरॉन पोलार्ड यांनाच ही कामगिरी करता आली होती. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीतही विराट चौथ्या क्रमांकावर आहे. विराटने आता T20 क्रिकेटमध्ये 12 हजार 536 धावा केल्या आहेत.
टी-20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज…
14 हजार 562 धावा – ख्रिस गेल
13 हजार 360 धावा – शोएब मलिक
12 हजार 900 धावा – किरॉन पोलार्ड.
12 हजार 536 धावा – विराट कोहली*