Faf du Plessis Historic Record For RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला आयपीएल 2024 चा चौथा विजय मिळवून देण्यात फाफ डू प्लेसिसने महत्त्वपूर्ण योगदान दिले. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने आक्रमक फलंदाजी करत 23 चेंडूत 64 धावा केल्या. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 3 षटकार मारले. या खेळीसह डु प्लेसिसने असा विक्रम केला जो विराट कोहली आणि ख्रिस गेलसारख्या दिग्गज फलंदाजांनाही साधता आला नाही.
खरं तर, त्याच्या 64 धावांच्या खेळीसह, पॉवर प्लेमध्ये 50 पेक्षा जास्त धावा करणारा फाफ डू प्लेसिस पहिला आरसीबी फलंदाज बनला आहे. यापूर्वी हा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर होता, ज्याने 2012, 2013 आणि 2015 च्या मोसमात 50-50 धावा केल्या होत्या. पण आता कर्णधार फाफ डु प्लेसिसने गेलचा हा विक्रम मोडीत काढला आहे. गुजरातविरुद्धच्या सामन्यात डू प्लेसिस 5.5 षटकांत बाद झाला. म्हणजेच पॉवर प्ले संपण्यापूर्वी एका चेंडूआधी तो पॅव्हेलियनमध्ये परतला होता. म्हणजेच त्यांन पाॅवर प्ले मध्ये 64 धावा काढल्या.
आरसीबीसाठी पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावा…
फाफ डू प्लेसिस- गुजरात टायटन्स विरुद्ध 64 धावा, 2024
ख्रिस गेल- 50 धावा विरुद्ध पुणे वॉरियर्स इंडिया, 2012
ख्रिस गेल- 50 धावा विरुद्ध पुणे वॉरियर्स इंडिया, 2013
ख्रिस गेल- 50 धावा विरुद्ध पुणे वॉरियर्स इंडिया, 2015
अवघ्या 18 चेंडूत पूर्ण केले अर्धशतक…
64 धावांची खेळी खेळताना डु प्लेसिसने अवघ्या 18 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, त्यानंतर तो आरसीबीसाठी सर्वात जलद अर्धशतक करणारा दुसरा फलंदाज ठरला. संघासाठी सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे, ज्याने 2013 मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध 17 चेंडूत अर्धशतक ठोकले होते.
आरसीबीसाठी सर्वात वेगवान अर्धशतक…
ख्रिस गेल- पुणे वॉरियर्स विरुद्ध 17 चेंडू, 2013
फाफ डू प्लेसिस- गुजरात टायटन्स विरुद्ध 18 चेंडू, 2024
रॉबिन उथप्पा- पंजाब विरुद्ध 19 चेंडू, 2010
रजत पाटीदार- हैदराबाद विरुद्ध 19 चेंडू, 2024