IPL 2024, Chennai Super Kings : आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या चेन्नई सुपर किंग्जच्या आशांना आधीच मोठा धक्का बसला आहे. त्यात पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात सीएसकेने मथिशा पाथिरानाला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट न केल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. आता चेन्नई सुपर किंग्जच्या अधिकृत वेबसाइटवर एक निवेदन जारी करण्यात आले आहे, ज्यामध्ये पाथिराना संपूर्ण हंगामातून बाहेर झाल्याचे सांगण्यात आले आहे.
पाथीरानाने चालू मोसमात केवळ 6 सामन्यात 13 विकेट घेतल्या होत्या, मात्र आता दुखापतीमुळे तो श्रीलंकेत परतला आहे. त्याचा इकॉनॉमी रेट केवळ 7.68 होता, त्यामुळे विकेट घेणारा गोलंदाज गमावल्याने CSK ला मोठा धक्का बसला आहे.
सीएसकेने एक निवेदन जारी करून असे म्हटले आहे की, “मथिशा पाथिरानाला हॅमस्ट्रिंगची दुखापत (हॅमस्ट्रिंग इंजरी) झाली आहे आणि पुढील तपासणीसाठी तो श्रीलंकेला परतला आहे.
🦁🚨 OFFICIAL ANNOUNCEMENT 🦁🚨 #WhistlePodu #Yellove
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 5, 2024
चेन्नईच्या अडचणी वाढल्या आहेत कारण त्याच्याआधी दीपक चहर देखील हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर आहे. त्याच्याशिवाय मुस्तफिझूर रहमान बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय मालिकेमुळे आधीच बांगलादेश संघात सामील झाला आहे. अशा स्थितीत चेन्नई सुपर किंग्जकडे वेगवान गोलंदाजीचे फार कमी पर्याय शिल्लक आहेत.
चेन्नईकडे आता शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे आणि रिचर्ड ग्लीसन यांच्या रूपाने 3 महत्त्वाचे पर्याय आहेत. अशा परिस्थितीत सीएसकेची प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता खूपच कमी दिसत आहे. अशा परिस्थितीत शिवम दुबे डावात चार षटके टाकताना दिसण्याचीही शक्यता आहे.
आयपीएल 2024 मध्ये CSK ची कामगिरी….
रविवारी (5 मे) होणाऱ्या पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जने 10 सामने खेळले, ज्यापैकी संघाने 5 जिंकले आहेत, परंतु 5 गमावले आहेत. संघ सध्या 10 गुणांसह गुणतालिकेत 5व्या स्थानावर आहे.