IPL 2024 (PBKS vs CSK Match Live Score) : आज आयपीएल 2024 च्या 53 व्या सामन्यात पंजाब किंग्जचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी होत आहे. धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम करनने नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 20 षटकांत 9 गडी गमावून 167 धावा केल्या असून पंजाबसमोर विजयासाठी 168 धावाचं लक्ष्य ठेवलं आहे.
P+U+N+J+A+B = 6! 😉
Let’s make it six wins in a row against the Super Kings! 🦁#SaddaPunjab #PunjabKings #JazbaHaiPunjabi #TATAIPL2024 #PBKSvCSK pic.twitter.com/x2ssq9CDsj
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) May 5, 2024
एकवेळ चेन्नईची धावसंख्या एका विकेटवर 60 धावा होती, पण मधल्या षटकांमध्ये सतत विकेट पडल्यामुळे त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात चांगली झाली नाही. अजिंक्य रहाणे 7 चेंडूत 9 धावा करून माघारी परतला. त्यावेळी चेन्नई सुपर किंग्जची धावसंख्या केवळ 12 होती. मात्र, यानंतर रुतुराज गायकवाड आणि डॅरिल मिशेल यांच्यात चांगली भागीदारी झाली. रुतुराज गायकवाड आणि डॅरिल मिशेल यांनी 57 धावा जोडल्या. मात्र ऋतुराज गायकवाड 32 धावा करून राहुल चहरच्या चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर 19 चेंडूत 30 धावा काढून डेरिल मिशेल हर्षल पटेलचा बळी ठरला.
एके काळी चेन्नईची धावसंख्या आठव्या षटकात 2 विकेटवर 69 धावा होती. यानंतर संघाने 98 धावा करताना उर्वरित 7 विकेट गमावल्या. टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झालेल्या शिवम दुबेला सलग दुसऱ्या सामन्यात खातेही उघडता आले नाही. डावातील पहिल्याच चेंडूवर तो बाद झाला. त्याचवेळी महेंद्रसिंग धोनीही डावातील पहिल्या चेंडूवर क्लीन बोल्ड झाला.
चेन्नईकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 26 चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 43 धावांची खेळी केली. तर ऋतुराज गायकवाडने 21 चेंडूत 32 आणि डॅरिल मिशेलने 19 चेंडूत 30 धावा केल्या. रहाणे 9 धावा केल्यानंतर, मोईन अली 17 धावा केल्यानंतर, मिचेल सँटनर 11 धावा केल्यानंतर, शार्दुल ठाकूर 17 धावा करून बाद झाला.
पंजाब किंग्जकडून राहुल चहर आणि हर्ष पटेल यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. राहुलने 4 षटकात 23 तर हर्ष पटेल याने 4 षटकात 24 धावा दिल्या. अर्शदीप सिंगने 4 षटकात 42 धावा देत 2 बळी घेतले तर सॅम करनने 4 षटकात 34 धावा देत 1 यश मिळवले.