Prime Minister Modi | nomination form | May 14 | Varanasi – पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवार, दि. १४ मे रोजी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजप शहर अध्यक्ष विद्यासागर राय यांनी रविवारी ही माहिती दिली. राय म्हणाले की, १३ मे रोजी मोदी मतदारसंघात रोड शो करणार असून त्याची तयारी सुरू आहे. रोड शोचा मार्ग निश्चित झाला आहे.
काँग्रेसने वाराणसीतून उत्तर प्रदेश युनिटचे प्रमुख अजय राय यांना उमेदवारी दिली असून बहुजन समाज पक्षाने (बीएसपी) अथर जमाल लारी यांना उमेदवारी दिली आहे. पंतप्रधान मोदी सलग तिसऱ्यांदा वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
वाराणसीमध्ये सातव्या म्हणजेच शेवटच्या टप्प्यातील मतदान १ मे रोजी होणार आहे. ४ जूनला निकाल लागणार आहे. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी पंतप्रधान मोदी १३ मे रोजी संध्याकाळी वाराणसीला पोहोचतील. येथे ते भव्य रोड शो करणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रादेशिक समितीने पंतप्रधानांच्या उमेदवारी अर्जासाठी सर्व कागदपत्रांची तयारी सुरू केली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक आठवडा आधी दिल्लीला पाठवला जाईल आणि त्यातली सगळी माहिती व्यवस्थित तपासली जाईल. त्यानंतर हा अर्ज स्थानिक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला जाईल.