Lok Sabha Election 2024 – राहुल गांधी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा एक द्वेषमुलक ॲनीमेटेड व्हिडीओ सोशल मिडीयात प्रसारीत करून आचार संहिता भंग केल्याची तक्रार कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
यात एस,एसटी समुदायाचा लाभ कॉंग्रेस नेते एका विशिष्ट समुदायाला देण्याचा प्रयत्न करीत असल्याची खोटी माहिती प्रसारीत करून आचार संहितेचे उल्लंघन मीडियावर धमकी देणारा व्हिडिओ पोस्ट करून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार कॉंग्रेसने केली आहे.
हे व्हिडीओ कर्नाटक भाजपच्या अधिकृत सोशलमिडीया अकाऊंटवरून प्रसारीत केले जात आहेत. भाजपचा सोशलमिडीया अमित मालविय यांच्याकडून चालवला जात असून त्यांचेही नाव या तक्रारीत घालण्यात आले आहे.
भाजप काँग्रेस पक्षावर मुस्लिमांचा ओबीसी प्रवर्गात समावेश केल्याचा खोटा आरोप करत आहे आणि असा खोटा प्रचार करून भाजप लोकसभा निवडणुकीत मतांची धार्मिक आधारावर मागणी करत आहे, असा आरोप यात करण्यात आला आहे.