पुणे – रेरा कायदा नवीन आहे. याचा बारकाईने आणि सखोल अभ्यास करण्याचे आवाहन सर्वोच्च न्यायालयातील प्रसिध्द वकील मकरंद आडकर यांनी केले. तसेच, पक्षकारांना जास्तीस जास्त कायद्याचा उपयोग करून द्यावा, असेही ते म्हटले.
रेरा प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, पुणेच्या वतीने “स्टडी सर्कल बैठकीची’ ची स्थापना करण्यात अली असून, याची पहिली बैठक नुकतीच झाली. यामध्ये रेरा कायद्यातील कलम 18 आणि त्यासोबत कलम 71 व 72 मधील तरतुदी बाबत समूह चर्चा करण्यात आली. या बैठकीचे उदघाटन अडकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून झाले. त्यांनी यावेळी सहभागी वकिल्लांना मार्गदर्शन केले.
वकील प्रतिस्पर्धी जरी असले तरी बंधुत्व म्हणून एकत्र काम करण्याचे आवाहन केले. रेरा प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, पुणेचे अध्यक्ष . निलेश बोराटे यांनी प्रास्ताविकामध्ये उपस्थित वकिलांना “स्टडी सर्कल’ च्या माध्यमातून होणाऱ्या समूह चर्चेचे महत्व सांगितले. पुढील काळात रेरा कायद्याच्या विविध विषयाबाबत होणाऱ्या बैठकांची माहिती दिली.
अॅड. संकेत बोरा यांनी “स्टडी सर्कल’ मधील समूह चर्चेच्या तज्ञ पॅनेलचे सदस्य म्हणून काम पाहिले. अॅड. अमित पाटील, अॅड.. चिंतामणी माने देशमुख, ऍड. वरून धारप, ऍड. मकरंद पराडकर, अॅड. झीनल ठक्कर, अॅड.. ऋषिकेश इंडिस यांनी “स्टडी सर्कल’ मधील समूह चर्चेमध्ये मेंटॉर आणि नियंत्रक म्हणून काम पाहिले. या प्रसंगी रेरा प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, पुणेचे उपाध्यक्ष अॅड. सुदीप केंजळकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. अॅड. सुरभी मेहता यांनी सूत्रसंचालन केले. अॅड. स्मिता तन्ना यांनी आभार मानले.