पुणे – दोन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या महिलेने गळफास घेउन आत्महत्या केली. ही घटना सिंहगड रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये रविवारी उघडकीस आली. रंगोली भास्करराव वडावराव (32, रा. धानोरी) असे या महिलेचे नाव आहे.
सिंहगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “पहिल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर रंगोली यांनी दोन महिन्यांपूर्वी दुसरे लग्न झाले होते. मात्र, कौटुंबिक वादातून रविवारी दुपारी त्या हॉटेलमध्ये राहण्यासाठी गेल्या होत्या. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास वेटरने दरवाजा वाजवल्यानंतरही रंगोली यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे हॉटेल व्यवस्थापनाने दुसऱ्या चावीने लॉक उघडल्यानंतर रंगोलीने गळफास घेतल्याचे दिसून आले.’