entertainment news – अभिनेत्री दीपिका पदुकोणचे बॉलिवुड किंग शाहरुख खानच्या Shahrukh Khan ‘जवान’ चित्रपटातील कॅमिओ रोलचे खूप कौतुक केले आहे. विशेषत: किंग खानसोबतच्या तिच्या केमिस्ट्रीबद्दल चाहते खूप चर्चा करत आहे. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान दीपिकाने शाहरुखसोबतच्या तिच्या बॉन्डबद्दल मोकळेपणाने बोलली आहे. तिने यावेळी शाहरुख खानला लकी चार्म म्हटले आहे.
दीपिका पदुकोणने 2007 मध्ये शाहरुख खान Shahrukh Khan सोबत ‘ओम शांती ओम’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर दीपिका पदुकोणन – शाहरुख खानने चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू इयर आणि पठाण यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.
आमचा नातं नशिबापेक्षा मोठं आहे. jawan movie deepika fees
चाहते दीपिका पदुकोण ला शाहरुख खान चा Shahrukh Khan ‘लकी चार्म’ मानतात यात शंका नाही कारण त्यांच्या जोडीने नेहमीच बॉक्स ऑफिसवर धमाका केला. याबाबत दीपिका पदुकोण म्हणाली, “आम्ही एकमेकांचे लकी चार्म आहोत. पण खरे सांगायचे तर, आम्ही नशिबाच्या वरचढ आहोत. आमचा एकमेकांवर खूप विश्वास आहे. मी अशा मोजक्या लोकांपैकी एक आहे. आमच्यामध्ये खूप विश्वास आणि आदर आहे आणि मला वाटते की आमचे बंध नशीबापेक्षा जास्त आहे.”
कॅमिओसाठी फी घेत नाही jawan movie deepika fees
जवान या चित्रपटातील तिच्या कॅमिओबद्दल बोलताना दीपिका पदुकोणने सांगितले की, ‘तिने या चित्रपटासाठी कोणतेही शुल्क घेतलेले नाही. दीपिका म्हणाली, “मी कॅमिओसाठी फी घेत नाही. शाहरुख खान Shahrukh Khan साठी जो काही कॅमिओ असेल, मी तिथे असेल. रोहित शेट्टीच्या बाबतीतही असेच आहे.” जवाना शिवाय दीपिकाने सर्कस आणि 83 सारख्या चित्रपटात कॅमिओ दिला आहे.