नवी दिल्ली – 2023 हे वर्ष पावसासाठी, एकूणच शेतकऱ्यांसाठी काहीसे असामाधानकारक असेच राहले. त्याचा परिणाम शेती उत्पादनावर झाला. यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत असून, अनेक शेतकऱ्यांनी मृत्यूला कवाटळल्याच्याही घटना समोर आल्या. असे असतानाच आता एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण, एल निनोचा प्रभाव ओसरत असून, येत्या मान्सून हंगामासाठी सकारात्मक बाब ठरण्याची चिन्हे आहेत.
अमेरिकी हवामान शास्त्र संस्था नोआने दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत महासागरातील एल निनोचा प्रभाव येत्या दोन महिन्यात कमी होण्याची शक्यता आहे. आगामी मान्सून हंगामाच्या आधी महासागराचे तापमान सर्वसाधारण पातळीवर येण्याचे संकेत असल्याने पुढील मान्सून हंगामासाठी ही सकारात्मक बाब आहे.
मागील काही वर्षांपासून देशातील मान्सूनवर एल निनोचा प्रभाव झाल्याचा दिसून आला. याचा थेट परिणाम 2023 मध्ये देशात सरासरीच्या 94 टक्के पावसाची नोंद झाली होती. तर, महाराष्ट्रातील सांगली, सातारा , सोलापूर, बीड, धाराशिव, हिंगोली, जालना, अकोला आणि अमरावती या नऊ जिल्ह्यांमध्ये अपुरा पाऊस नोंदला गेला.
महाराष्ट्रात यंदा एकूण 974.7 मि.मी. एवढाच पाऊस बरसला. मागील पाच वर्षांच्या तुलनेत 2023 या वर्षात झालेला पाऊस हा समाधानकारक असल्याची माहिती कृषी विज्ञान केंद्रातील वैज्ञानिकांनी दिली होती. याचदरम्यान आता पावसाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. कारण, अमेरिकी हवामान शास्त्र संस्था नोआने प्रशांत महासागरातील अल निनोचा प्रभाव पुढील दोन महिन्यांत कमी होणार असल्याची दिलासादायक माहिती दिली आहे.