पारनेर -पारनेर तालुक्यातील करंदी येथील मळगंगा देवी देवस्थान ट्रस्टचा सालाबादप्रमाणे होणारा शारदीय नवरात्र उत्सव करोना आजाराच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला असल्याचे मंळगंगा देवी देवस्थान ट्रस्टचे सचिव शिवाजीराव ठाणगे यांनी जाहीर केले.
पारनेर तालुक्यातील करंदी येथील मळगंगा देवी देवस्थान ट्रस्टच्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित देवस्थानचे विश्वस्त व पोलीस अधिकारी यांच्या सामाजिक अंतर ठेवून आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पारनेरचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश गवळी तंटामुक्ती अध्यक्ष राधूजी ठाणगे, सरपंच नामदेव ठाणगे, देवस्थानचे विश्वस्त जिजाभाऊ थोरात, उपाध्यक्ष सदानंद गव्हाणे, संतोष थोरात, किरण ठाणगे, भाऊसाहेब पिंपरकर, आनंदा गव्हाणे, भगवान ठाणगे, सावळेराम ठाणगे, बबनराव चौधरी, ग्रा. पं. सदस्य जितेंद्र उघडे, बबनराव आतकर, माजी सरपंच सुनील ठाणगे, नामदेव गांगड, धोंडीभाऊ ठाणगे आदी उपस्थित होते.
ठाणगे म्हणाले, सध्या राज्यात करोनाचा प्रसार वाढत असून, जनतेच्या अरोग्यासाठी शासनाने विविध सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध घातले आहेत. त्या सर्व बाबींना अधिन राहून यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव घरीच राहून साध्या पद्धतीने करण्यात यावा.
पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी शासकिय नियमावली आणि माहिती सांगून मंदिर परिसरात गर्दी न करता आजाराचा प्रादुर्भाव न वाढवता स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केले. यावेळी सरंपच नामदेव गांगड, तंटामुक्ती अध्यक्ष राधूजी ठाणगे, देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त जिजाभाऊ थोरात यांनी ही यावेळी कोरोना आजारापासुन स्वतःचे व कुटुंबाचे आरोग्य आबाधित राखण्यासाठी काळजी घेवून परिसरातील मुंबई, पुणे स्थित भाविकांनी या वर्षी देवीच्या दर्शनाला व नवस पूर्तीसाठी येऊ नये, असे आवाहन करण्यात आले.