शिरगाव (वार्ताहर) – भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शिरगाव ते कासारसाई रस्त्यावर रविवारी (दि. 5) सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास घडली.
हिराबाई साहेबराव मोरे (वय 70, रा. दारूंब्रे, ता. मावळ) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कन्हैया मारुती सोरटे (वय 30) यांनी सोमवारी (दि. ६) शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरगाव ते कासारसाई या रस्त्याने हिराबाई या पायी चालल्या होत्या. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात हिराबाई यांचा मृत्यू झाला.
अपघात ३३ झाल्यानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळी न थांबता तसेच अपघाताची माहिती न देता निघून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.