Narendra Modi । पंजाब-हरियाणाच्या शंभू सीमेवर शेतकरी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहे. सरकारशी शेतकऱ्यांची चर्चा चौथ्यांदा निष्फळ ठरली. त्यांच्या मागण्या कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले.
यावेळी ऑल इंडिया अँटी टेररिस्ट फ्रंटचे मनिंदरजीत सिंग बिट्टा यांनी खबळजनक विधान केले आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान काही आंदोलकांनी पीएम मोदींबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे. ते पुढे म्हणाले, आम्ही त्याचा अपमान सहन करू शकत नाही.
#WATCH | Valsad, Gujarat | All-India Anti-Terrorist Front chairman, Maninderjit Singh Bitta says, “…You may not like the popular PM of India but the entire world salutes him…You may abuse him but if words like “pehle Punjab mein bach gaya, hum inko maar denge” are uttered… pic.twitter.com/y68O8AiUi4
— ANI (@ANI) February 20, 2024
इंदिरा गांधींचा संदर्भ देत बिट्टा म्हणाले की,’इंदिरा गांधी यांची हत्या कशी झाली हे इतिहासाच्या पानात नोंदवलेले आहे.पीएम मोदींना मिळालेल्या धमक्यांचा संदर्भ देत त्यांनी तुम्हाला इतिहासाची पाने उघडायची आहेत का ? ‘ असा सवाल केला.
नेमकं काय म्हणाले मनिंदरजीत सिंह बिट्टा
ऑल इंडिया अँटी टेररिस्ट फ्रंटचे मनिंदरजीत सिंग बिट्टा यांनी शंभू सीमेवर बसलेल्या काही आंदोलक शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल टिप्पणी केलेल्या व्हिडिओ फुटेजचा उल्लेख केला. मनिंदरजीत सिंह बिट्टा म्हणाले, ‘इंदिरा गांधी शहीद झाल्या, इतिहास तुमच्यासमोर आहे, तुम्हाला इतिहासाची रक्तरंजित पाने उघडायची आहेत का?” (शेतकऱ्यांच्या) चळवळीत जगाने ज्यांना वंदन केले, जगातील प्रसिद्ध नेते तुम्हाला आवडत नसतील, तर ठीक आहे, अमेरिकेने त्यांच्यासाठी लाल गालिचा अंथरला, ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी त्यांच्या पायाला हात लावला. तुम्हाला ते आवडत नाही, तुम्ही शिव्या द्या, तुम्हाला वाट्टेल ते बोला. पण ‘आधी मी पंजाबमध्ये वाचलो, आता नाही’ अशी धमकीवजा टीका करून मला मारणार असाल तर ‘पगडी’ गप्प बसणार नाही.’ असेही ते म्हणाले आहे.
बिट्टा पुढे म्हणाले, ‘आमच्या पंतप्रधानांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहे. मी शेतकऱ्यांबद्दल बोलत नाही तर खलिस्तानी घोषणा आणि मोदीविरोधी घोषणांबद्दल बोलत आहे. असे आंदोलन कदापि खपवून घेतले जाणार नाही. ते व्हिडीओ शोधा, हे शब्द कोणी बोलले?” असा प[प्रश्नही त्याने उपस्थित केला आहे.