Rohit Pawar on Ajit Pawar। निवडणूक आयोगाने नुकतेच अजित पवार गटाला मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता दिली. तसेच पक्षाचे चिन्हदेखील अजित पवार गटाला दिले. दुसऱ्या बाजूला शरद पवार गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ असं नाव देण्यात आलं. परंतु, हे नाव राज्यसभा निवडणुकीपुरतंच वापरता येणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती विश्वनाथन यांच्या खंडपीठाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली.
‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ नावाचा पुढील सुनावणीपर्यंत वापर Rohit Pawar on Ajit Pawar।
दरम्यान, शरद पवार यांच्या पक्षाला निवडणूक आयोगाने दिलेल्या नवीन नावात असलेल्या ‘राष्ट्रवादी’ या शब्दावरही अजित पवार गटाच्या वकिलांनी आक्षेप घेतला होता. परंतु, न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत शरद पवार गट हेच नाव वापरू शकतो, असे आदेश दिले. दरम्यान, अजित पवार गटाच्या वकिलांनी न्यायालयात केलेल्या युक्तीवादावर शरद पवार गटाने नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा
अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रोहित पवारांचे सडेतोड उत्तर…वाचा
शरद पवार गटातील आमदार रोहित पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन नावाबाबत अजित पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार यांच्या बाजूने निकाल दिला. या निकालाबद्दल मी सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार मानतो. अजित पवार गटाने न्यायालयात आमच्याविरोधात केलेला युक्तीवादही चुकीचा होता.
जगण्यासाठी यांना ऑक्सिजन लागतोय तोही देऊ नका Rohit Pawar on Ajit Pawar।
त्यांचे वकील न्यायालयात म्हणत होते की, यांना पक्ष देऊ नका, चिन्हही देऊ नका. अजित पवार उद्या भाजपातच गेले तर त्यांचा अहंकार इतका वाढेल आणि ते म्हणतील की, जगण्यासाठी यांना ऑक्सिजन लागतोय तोही देऊ नका. अजित पवार गट न्यायालयात तशी शिफारसही करेल. आम्हाला संविधानाने दिलेल्या अधिकारांवरही टाच आणण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून चालू आहे.