चेन्नई : तामिळनाडूत एका मुस्लीम दाम्पत्याने आपल्या आयुष्याच्या जोडीदाराशी गाठ सुधारीत नागरीकत्व कायद्याच्या निदर्शनात बांधली. उत्तर चेन्नईत हा अनोखा निकाह सोहळा रंगला.
सुमय्या आणि शाहीन शाह हे उत्तर चेन्नईत का कायच्याच्या विरोधात सुरू असणाऱ्या निदर्शनाजवळ आले. त्यावेळी जमलेल्या निदर्शकांनी निषेधाच्या घोषणा थांबवून त्यांचे स्वागत केले. तेथे आलेल्या इमामांनी त्यांच्या विवाहाचे धार्मिक विधी पार पाडले. या दाम्पत्यांची त्यांनी जमावाला ओळख करून दिली. ज्येष्ठांनी नव दाम्पत्याला आशिर्वाद दिले. छोटेखानी समारंभात हा विवाह पार पडल्यावर निदर्शकांनी त्यांच्यावर भेटवस्तूंचा अक्षरश: पाऊस पाडला.
विवाहानंतर हातात फलक घेत का कायद्या विरोधात घोषणा देत हे दाम्पत्य आंदोलनात सहभागी झाले. हे दाम्पत्य यापुर्वीही या आंदोलनात सक्रीय होते. त्यांनी निदर्शनातच विवाहबध्द होण्याचा निर्णय घेतला. त्याला ज्येष्ठांनी मान्यता दिली. कशीदाकाम केलेली लाल साडी वधूने परिधान केली होती. तर वराने दाट तपकिरी रंगाचा वेश परिधान केला होता.
येथ्र 14 फेब्रुवारी पासून जुन्या वॉशरमनपेट येथे निदर्शने सुरू झाली आहेत.