IPL 2024 (PBKS Vs CSK Match Live Score) : आज आयपीएल 2024 च्या 53 व्या सामन्यात पंजाब किंग्जचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी होत आहे. धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे.
पंजाबने गेल्या सामन्यात घरच्या मैदानावर चेन्नईचा पराभव केला होता. आता बदला घेण्याचे चेन्नईचे लक्ष्य असेल, तर पंजाब संघाचे सीएसकेविरुद्ध विजयाचा षटकार लगवण्याचे लक्ष्य असेल. या दोघांमधील गेल्या पाच सामन्यांमध्ये फक्त पंजाब संघानेच विजय मिळवला आहे.
तत्पूर्वी, झालेला नाणेफकीचा कौल हा पंजाब किंग्ज संघाच्या बाजूनं लागला आहे. पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम करनने नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने आपल्या प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्याचवेळी, सीएसकेचा कर्णधार रुतुराज गायकवाडने 11व्या सामन्यात 10व्यांदा नाणेफेक गमावली आहे. चेन्नईच्या प्लेइंग-11 मध्ये बदल करण्यात आला आहे. मुस्तफिजुर रहमानच्या जागी मिचेल सँटनरचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे.
🚨 Toss Update 🚨@PunjabKingsIPL elect to bowl first against @ChennaiIPL
Follow the Match ▶️ https://t.co/WxW3UyUZq6#TATAIPL | #PBKSvCSK pic.twitter.com/ilFcGVDc8Q
— IndianPremierLeague (@IPL) May 5, 2024
PBKS vs CSK Live : दोन्ही संघाची प्लेइंग-11 खालीलप्रमाणे…
चेन्नई सुपर किंग्ज : अजिंक्य रहाणे, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, रिचर्ड ग्लीसन, तुषार देशपांडे. ( इम्पॅक्ट सब : समीर रिझवी, सिमरजीत सिंग, शेख रशीद, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी)
पंजाब किंग्ज : जॉनी बेअरस्टो, रिले रौसो, शशांक सिंग, सॅम कुरन (क), जितेश शर्मा (विकेटकीपर), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, राहुल चहर, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग ( इम्पॅक्ट सब : प्रभसिमरन सिंग, हरप्रीत सिंग भाटिया, तनय थियागराजन, विद्वत कवेरप्पा, ऋषी धवन )
मागील सामन्यात पंजाब किंग्जने चेपॉक येथे सीएसकेचा सात गडी राखून पराभव केला होता. घरच्या मैदानावर गेल्या तीन सामन्यांतील हा दुसरा पराभव असल्याने संघ अडचणीत सापडला आहे. चेन्नईने या मोसमात 10 सामने खेळले आहेत. या कालावधीत त्यांनी 5 सामने जिंकले आहेत आणि 5 मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
IPL 2024 : विराट अन् डू-प्लेसिसची तूफानी खेळी, बेंगळुरूचा गुजरातवर शानदार विजय..
पंजाबने या मोसमात 10 सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 4 सामने जिंकले आहेत. त्याचवेळी 6 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे.