सव्वातीन कोटी शालेय पाससाठी महापालिका देणार

पिंपरी  – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तसेच खासगी शाळांतील पाचवी, दहावीच्या विद्यार्थ्यांना पीएमपीएमएल बस प्रवास सवलत पाससाठी अर्जाचे वाटप सुरू करण्यात आले आहे. या योजनेसाठी पालिका सन 2019-20 या आर्थिक वर्षात तब्बल 3 कोटी 20 लाख रूपये मोजणार आहे. भरून दिलेल्या अर्जाची स्वीकृती शहरातील पीएमपीएमएलच्या आगारात करण्यात येणार आहे.

शहरातील पास केंद्र आणि नागरी सुविधा केंद्रात केवळ अर्जाचे वाटप केले जाणार ते आहे. शाळेकडून सर्व विद्यार्थ्यांचे एकत्रित अर्ज भरून दिल्यास सर्व पासेस शाळेत वितरीत केले जातील. खासगी शाळातील विद्यार्थ्यांच्या अर्जासोबतच्या कागदपत्रांची तपासणी झाल्यावर पासची 25 टक्के रक्कम चलनान्वये बॅंक ऑफ बडोदाच्या कोणत्याही शाखेत महापालिकेच्या खात्यावर भरावी. त्यानंतर अर्ज, चलन व कागदपत्रे जवळच्या पीएमपीएलच्या आगारात सादर करावी. बस पास अर्ज वितरण सोमवार (दि. 17) पासून सुरु करण्यात आले आहे. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी पीएमपीएमएलच्या वतीने मोफत पास दिला जातो. केवळ शैक्षणिक वापरासाठी हा पास उपयोगात आणला जातो. तर खासगी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना एकूण पासाची केवळ 25 टक्के रक्कम भरुन ही सुविधा उपलब्ध करुन दिली जात आहे. शाळांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

विद्यार्थ्यांना अत्यावश्‍यक शालेय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिका नेहमी प्रयत्नशील असते. शाळेपासून दूर अंतरावर राहणाऱ्या महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना या योजनेचा चांगला फायदा होतो. याशिवाय खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांनादेखील ही योजना सवलतीच्या दरात उपलब्ध करुन दिली आहे.

विलास मडिगेरी, अध्यक्ष, स्थायी समिती पिंपरी-चिंचवड महापालिका

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here