Mukesh Ambani : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना मागील काही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमकीचे मेल येत आहे. अज्ञात व्यक्तिकडून अंबानी यांच्याकडे 400 रुपयांची खंडणी मागितली जात होती. मात्र आता अंबानी यांना धमकी देणाऱ्या आरोपीला तेलंगणामधून अटक करण्यात आली आहे. णेश वानपारधी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. मुंबई पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. अटकेनंतर आता आरोपीला 8 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुकेश अंबानींच्या ईमेल 27 ऑक्टोबर रोजी अकाऊंटवर एक मेल आला होता. ज्यामध्ये त्यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीनं मुकेश अंबानी यांच्याकडे 20 कोटी रुपयांची मागणी केली होती आणि जर पैसे दिले नाहीत, तर जीव गमवावा लागेल, असे म्हंटले होते. या धमकीनंतर मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा प्रभारींच्या तक्रारीच्या आधारे, गावदेवी पोलिसांनी आयपीसीच्या कलम 387 आणि 506 (2) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.
आरोपीने पहिल्यांदा 20 कोटींची मागणी केल्यानंतर दुसऱ्यांदा 200 कोटीची मागणी केली होती आणि त्यानंतर 400 कोटी रुपयांची मागणी आरोपींनी केली होती. मात्र मागील काही दिवसांपासून पोलिस आरोपीचा शोध घेत होते. अखेर त्याला तेलंगणामधून ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान, मुकेश अंबानी यांना पहिल्यांदाच धमकीचा मेल आलेला नाही. यापूर्वी देखील त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यापूर्वी दक्षिण मुंबईतील अंबानींच्या ‘अँटिलिया’ या आलिशान घराजवळ ही कार सापडली होती. त्यात 20 जिलेटिनच्या काड्या आणि एक पत्र सापडले होते.
तर 2022 मध्ये रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या नंबरवर एका अनोळखी नंबरवरून धमकी देणारा कॉल आला होता. सदर धमकी देणाऱ्या व्यक्तीने रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल उडवून देण्याची तसेच अंबानी कुटुंबियांच्या संदर्भात धमकी दिली होती.