Kiran Mane – बिग बॉस मराठी फेम अभिनेता ‘किरण माने’ (Kiran Mane) विविध विषयांवर परखडपणे आपले मत व्यक्त करत असतो. यावरून अनेकदा त्याच्यावर टीका देखील केली जाते. परंतु ते त्याकडे दुर्लक्ष करत आपली भूमिका सोशल मीडियावर व्यक्त करत असतात.
दरम्यान, अश्यातच किरण माने (Kiran Mane) यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मराठा आरक्षणाबद्दल (Maratha Reservation) आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) आपलं मत व्यक्त करताना दिसत आहेत. यापूर्वी देखील त्यांनी अनेक पोस्ट शेअर केल्या होत्या.
“जरांगे पाटील… या देशात एक सामान्य माणूस व्यवस्था हलवू शकतो, हे तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.’ आता आरक्षणाबद्दल आणखी एक पोस्ट किरण माने यांनी शेअर केली आहे.
या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी मराठा बांधवांना सांगितलं आहे की, ‘आरक्षणाला समर्थन देताना परजातीला कमी लेखणे त्वरित थांबवा’ असं ते म्हणाले आहेत.
काय आहे किरण माने यांची फेसबुक पोस्ट
मराठा बांधवांनो..! आपल्या महामानवांनी कधीही दूसर्या समाजाला कमी लेखलं नाही. तुकोबारायांनी विठ्ठलामध्ये बुद्धाला पाहिलं. छ. शिवरायांनी सिद्दी इब्राहीमला अंगरक्षक पद दिलं. शाहूराजांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांसारखा विश्वरत्न घडवला.!
आरक्षणाला समर्थन देताना परजातीला कमी लेखणे किंवा भावनेच्या भरात कुणाची तुलना असामान्य महामानवांसोबत करून कटुता आणणे या गोष्टी त्वरित थांबवा. आपली लढाई स्वबळावर लढुया, कुणाला कमी लेखून नाही.