Mukesh Ambani – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना सातत्याने धमकीचे मेल येत आहेत. 27 ऑक्टोबर रोजी मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) ईमेल अकाऊंटवर एक मेल आला होता. मेल करणाऱ्या व्यक्तीने 20 कोटी रुपयांची मागणी केली होती आणि जर पैसे दिले नाहीत, तर आपला जीव गमवावा लागेल, असे म्हटले होते.
तो ईमेल मिळाल्यानंतर, मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा प्रभारींच्या तक्रारीच्या आधारे, गावदेवी पोलिसांनी आयपीसीच्या कलम 387 आणि 506 (2) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. पहिल्यांदा आरोपीने 20 कोटी, तर दुसऱ्यांदा 200 कोटीची मागणी केली होती.
त्यानंतर आरोपींने तिसरा ईमेल करत 400 कोटी रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणी पोलिसांकडून आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर आता तिसऱ्या आरोपीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.