नवी दिल्ली – छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (bhupesh baghel) यांनी 24 ऑगस्ट 2023 रोजीच केंद्र सरकारकडे महादेव ऍप (Mahadev App) या सट्टेबाजीच्या ऍपवर बंदी घालण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती. पण त्यावर बंदी न घालता केंद्र सरकारने उलट बघेल यांच्यावरच खोटे आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न चालवला आहे असा आरोप कॉंग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी आज केला. ते म्हणाले की या ऍपवरील बंदीची शिफारस संबंधीत सरकारने करूनही केंद्र सरकारने त्या ऍपवर बंदी घालण्यास वेळ का लावला याचे आश्चर्य वाटते.
24 ऑगस्ट 2023 रोजी कॉंग्रेस (Congress) मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बघेल यांनी या ऍपशी संबंधीत आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती पण केंद्र सरकारने वर ऍपवर 28 टक्के जीएसटी कर लादून ऑनलाइन सट्टेबाजीला कायदेशीर दर्जा दिला आहे.
त्या पत्रकार परिषदेचा व्हिडीओही रमेश यांनी शेअर केला आहे या ऍप ऑपरेटरशी भाजपचा (bjp) काहीं संबंध आहे काय असा सवालही त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जनता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या बाजूने जनादेश देऊन भाजपच्या या कारवायांना चोख प्रत्युत्तर देईल, असे रमेश यांनी सांगितले.