खासदार फुलनदेवी!

फुलनदेवी ही राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी एका दरोडेखोरांच्या टोळीची प्रमुख होती. तिला “बॅंडिट क्वीन’ या नावाने ओळखलं जायचं. तिच्या आयुष्यावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकाने व बनवल्या गेलेल्या चित्रपटामुळे ती जगप्रसिद्ध झाली. फुलनदेवीचा विवाह अगदी लहान वयात एका वयस्कर माणसाशी झाला. त्यानंतरही कित्येकदा तिचे लैंगिक शोषण झाले. त्यानंतर असे मानण्यात आले की, तिचे एका दरोडेखोरांच्या टोळीने अपहरण केले व नंतर तिने त्यातील दरोडेखोराशी लग्न केले. त्यानंतर तिने कित्येक दरोडे घातले व खूनही केले.

असे म्हटले जात होते की ती फक्त श्रीमंत लोकांना मारते, त्यांची संपत्ती लुटते व गरिबांना वाटते. त्यानंतर तिने गावातील सर्व श्रीमंत लोकांना मारून स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. अशिक्षित असलेल्या फुलनदेवीने भारतीय राजकारणात महत्त्वाची कामगिरी बजावली. त्यानंतर ती पेरोलवर सुटली आणि उत्तर प्रदेश सरकारने तिच्यावरील सर्व केसेस रद्द केल्या. 1996 साली ती समाजवादी पक्षातर्फे निवडणुकीला उभी राहिली. त्या निवडणुकीत ती पराभूत झाली पण नंतर ती खासदार म्हणून विजयी झाली व त्यानंतर शेवटपर्यंत त्या पदावर राहिली. 2001 मध्ये तिचे निधन झाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.