पुणे – शिरूर लोकसभा मतदारसंघातून दोन अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम मुदत ही दि.9 एप्रिलपर्यंत आहे. तर उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत ही दि.12 एप्रिल आहे. दरम्यान, प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी अद्याप उमेदवारी अर्ज दाखल केलेले नाहीत. येत्या सोमवारी आणि मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे.