रांजणगाव गणपती – रांजणगाव औद्योगिक वसाहतींमधील बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या नावाने सोशल मीडियावर जाहिराती देऊन गोरगरीब मुलांना रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये बोलून त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या व त्यांना शिवीगाळ व दमदाटी करणाऱ्या टोळीला रांजणगाव पोलिसांनी अटक केली.
14 ऑगस्ट रोजी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात लक्ष्मण उर्फ दादा तुकाराम डाळींबकर (वय 26, रा. बाभूळसर खुर्द), सदानंद गजानन वानखेडे (वय 22, रा. सारशिव मेहकर जि. बुलडाणा) यांना अटक केली आहे. तर सागर विजय रोडे (रा. करडे) यास आजारी असल्यामुळे सूचना पत्र देऊन कारवाई केली आहे. राहुल वाळुंज (रा. पारनेर) हा आरोपी फरार आहे.
“एमआयडीसी परिसरात अशा प्रकारे कोणी लूट करत असेल, तर तात्काळ रांजणगाव पोलीस स्टेशनला संपर्क साधावा. रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील कोणत्याही राष्ट्रीयकृत कंपन्या कोणालाही प्लेसमेंटसाठी नेमत नसून ते स्वतः प्लेसमेंट करत असतात. त्यामुळे कोणीही अशा लोकांच्या आमिषाला बळी पडू नये.
-सुरेशकुमार राऊत, पोलीस निरीक्षक रांजणगाव
या टोळक्याने बोगस नावांचा वापर करुन प्लेसमेंटच्या माध्यमातून सोशल मीडियाद्वारे जाहिरात देऊन एमआयडीसी मध्ये बोलावून त्यांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पैसे घेत. त्यांना प्रत्यक्षात जाहिरातीमध्ये दिलेल्या कंपन्यांमध्ये नोकरी न लावता इतर ठिकाणी बिगाऱ्याची काम करायला लावून पगार न देता मारहाण करुन हाकलून देत होते. यातील बहुतांश आरोपींनी बोगस नावाचा वापर करून प्लेसमेंट सुरू केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदीप येळे, सुनील नर्के, पांडुरंग साबळे, दत्तात्रय शिंदे व सूरज वळेकर यांनी केली.