‘मोदी सरकारकडे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पैसे नाहीत; मात्र जाहिरातींवर कोटींची उधळपट्टी’

मुंबई: मोदी सरकारकडे महाराष्ट्रातील दुष्काळ व पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पैसे नाहीत जाहिरातींवर मात्र ५,७०० कोटींची उधळपट्टी केल्याचे समोर आले आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने भाजपवर निशाणा साधला आहे.

अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने दुष्काळ, वादळ, महापूर अशा नैसर्गिक आपत्तीसाठी केंद्र सरकारच्या वतीने कर्नाटक, ओडिशा या राज्यांसाठी करोडो रूपये मंजूर केले आहेत. महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी ६८०० कोटी रुपयांची मदत केंद्राकडे मागून प्रसिद्धी मिळविली होती. केंद्राने मात्र फडणवीस यांना ठेंगा दाखविला. अन्य राज्यांना भरघोस मदत देताना महाराष्ट्राला मात्र एकही छदाम दिलेला नाही. दुस-या बाजूला सरकारचा प्रचार करण्यासाठी मोदी सरकारने ५,७०० कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याचे समोर आले आहे, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर पोस्ट केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेली सादर माहिती अशी, हिंदी भाषिक राज्यांमधील जनतेला भुलविण्यासाठी मोदी सरकारने इंग्रजी वृत्तपत्रांच्या तुलनेत हिंदी भाषिक वृत्तपत्रांसाठी भरपूर पैसा ओतला आहे. इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये सरकारी जाहिरातींसाठी मोदी सरकारने ७१९ कोटी रुपयांहून अधिक पैसे खर्च केलेत, तर हिंदी वृत्तपत्रांमध्ये जाहिरातींसाठी ८९० कोटींहून अधिक पैसे मोजल्याचं समोर आलं आहे. माहिती अधिकारातून याबाबतची आकडेवारी समोर आली आहे. मे २०१४ ते मार्च २०१९ दरम्यान जाहिरातींवर सरकारने एकूण ५ हजार ७०० कोटी रुपये खर्च केल्याचं या आकडेवारीतून समोर आलं आहे.


इंटरनेटच्या जाहिरातीवरही चौपट उधळपट्टी

इंटरनेटवरील वाचकांच्या वाढत असलेल्या संख्येचा फायदा उचलत ५ वर्षांच्या कालावधीत इंटरनेट जाहिरातींवरील खर्च ६.६४ कोटी रुपयांहून वाढवून २६.९५ कोटी रुपये झाल्याचं आरटीआयमधून समोर आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)