नवी दिल्ली – यंदाच्या ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्काराने एनडीटीव्हीचे पत्रकार ‘रविश कुमार’ यांना सन्मानित करण्यात आले आहे. आशियाचा नोबेल पुरस्कार म्हणून ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्काराची ओळख आहे. पत्रकारिता क्षेत्रातील कामासाठी रविश कुमार यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. फिलिपाईन्सचे माजी राष्ट्रपती ‘रॅमन मॅगसेसे’ यांच्या नावाने मागील 60 वर्षांपासून हा पुरस्कार दिला जातो.
“Not all battles are fought for victory – some are fought to tell the world that someone was there on the battlefield.” – @ravishndtv
Congratulations #RavishKumar for winning the #RamonMagsaysayAward
Wish that ‘Someone’ never gets tired in his pursuit of truth. pic.twitter.com/led6UDl71y— All India Mahila Congress (@MahilaCongress) September 9, 2019
दरम्यान, सरकारी सेवा, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, शांतता आणि आंतरराष्ट्रीय संबंध इत्यादी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराची सुरुवात न्यूयॉर्कमधील रॉकफेलर भावंडांनी केली होती.