#CWC19 : हिट विकेट होणारा 10 वा खेळाडू बनला ‘मार्टिन गुप्टिल’

बर्मिंगहॅम – दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान झालेल्या सामन्यात सर्वांच्या नजरा या मार्टिन गुप्टिल याच्यावर खिळल्या होत्या. पण वैयक्तिक 35 धावांवर असताना फेलुकवायो याच्या एका आखुड टप्प्याच्या चेंडूवर पुल करताना गुप्टिलचा बॅलेन्स गेला आणि त्याचा पाय स्टंपना लागला आणि तो विचित्र पद्धतीने बाद झाला. शॉर्ट खेळताना तो जागेवर दोन वेळा फिरला आणि हीट विकेट झाला. विश्‍वचषकात अशा पद्धतीने बाद होणारा तो दहावा खेळाडू बनला आहे.

अशा पद्धतीने बाद होणाऱ्या खेळाडूंची यादी –

आर.फ्रेडरिक्‍स (वेस्ट इंडिज) – ऑस्ट्रेलिया विरूद्ध – 1975, एफ डेनिस (कॅनडा) – इंग्लंड विरूद्ध – 1979, मॉरिस ओडुम्बे (केनिया) – वेस्ट इंडिज विरूद्ध – 1996, गैरी कर्स्टन (दक्षिण आफ्रिका) – वेस्ट इंडिज विरूद्ध – 1996, जे हैरिस (कनाडा) – श्रीलंका विरूद्ध – 2003, मॉरिस ओडुम्बे (केनिया) – वेस्ट इंडिज विरूद्ध – 2003, वी.सिबांदा (झिम्बाब्वे) – आयर्लंड विरूद्ध – 2007, आर.चकाब्वा (झिम्बाब्वे) – यूएई विरूद्ध – 2015, मिस्बाह उल हक (पाकिस्तान) – आयर्लंड विरूद्ध – 2015, मार्टिन गुप्टिल (न्यूझीलंड) – दक्षिण आफ्रिका विरूद्ध – 2019.

Leave A Reply

Your email address will not be published.