#ICCWorldCup2019: विश्वचषकात आज ‘श्रीलंका-इंग्लंड’ आमनेसामने

विश्‍वचषकातील आव्हान कायम राखण्यास विजय आवश्‍यक

लीड्‌स: विश्‍वचषकातीलाअपल्या पाच सामन्यांपैकी केवळ एका सामन्यात विजय मिळवू शकलेल्या श्रीलंकेसमोर विश्‍वचषकातील सर्वात समतोल संघ समजल्या जाणाऱ्या बलाढ्य इंग्लंडचे आव्हान असुन आजच्या सामन्यात पराभुत झाल्यास श्रीलंकेचे विश्‍वचसकातील आव्हान संपुष्टात येणार आहे.

यंदाच्या विश्‍वचषकात इंग्लंडचा संघ आपल्या पहिल्या सामन्यापासुन कमालीच्या फॉर्ममध्ये असुन यासंघाने आपल्या पाच सामन्यांपैकी चार सामन्यात विजय मिळवला असुन एका सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागल्याने ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहेत. तर, श्रीलंकेच्या संघाने आपल्या पाच सामन्यांपैकीदोन सामन्यात विजय मिळवला आहे तर दोन सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला असुन दोन सामने पावसामुळे रद्द झाल्याने त्यांचे 4 गुण झालेले असुन ते सध्या गुणतालीकेत सहाव्या क्रमांकावर आहेत.

विश्‍वचसक स्पर्धेची सुरूवात होण्यापुर्वीच श्रीलंकेचा संघ कमजोर संघ समजला जात होता. कारण, त्यांच्या संघातील प्रमुख खेळाडूंनी निवृत्ती स्विकारल्यानंतर दुसऱ्या फळीतील सक्षम खेळाडूंचा अभाव तसेच त्यांच्या क्रिकेट संघटनेत नित्याने होत असलेले बदल आणि भ्रष्टाचार यांच्यामुळे श्रीलंकेचा संघ खुप कमजोर झाला आहे. त्यातच सतत पराभवांचा सामना केल्याने त्यांच्या खेळाडूंमधील सकारात्मकता कमी झाली असुन त्यांना विजय मिळवायचा असल्यास त्यांच्या खेळाडूंनी आपल्या कामगिरीत सकारात्मकता आणायला हवी.

तर, दुसरीकडे इंग्लंडच्या संघाने मागील विश्‍वचषक स्पर्धेत अनपेक्षित पराभव पत्करुन आपला गाशा गुंडाळल्यानंतर आपल्या खेळीत आणि तंत्रात आवश्‍यक बदल केले. त्यांच्या या पावलाने त्यांच्या संघाचा संपुर्ण कायापालट झाला असून सध्या इंग्लंडचा संघ विश्‍वचषक विजेतेपदाचा प्रमुख दावेदार समजला जातो आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात विचार केल्यास इंग्लंडच्या संघाचे पारडे श्रीलंकेच्या संघापेक्षा अधीक जड वाटते.

प्रतिस्पर्धी संघ –
इंग्लंड – इऑन मॉर्गन (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), जॉनी बेयरस्टो, जेम्स विन्स, बेन स्टोक्‍स, मोईन अली, जोफ्रा आर्चर, टॉम करन, लायन डॉसन, लीयाम प्लंकेट, आदिल रशीद, जो रूट, जेसन रॉय, ख्रिस वोक्‍स, मार्क वुड.

श्रीलंका – दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), धनंजय डि सिल्व्हा, नुवान प्रदीप, अविष्का फर्नांडो, सुरंगा लकमल, लसिथ मलिंगा, अँजेलो मॅथ्यूज, कुशल मेंडिस, जीवन मेंडिस, कुशल परेरा, थिसारा परेरा, मिलिंदा सिरीवर्धने, लहिरु थिरिमाने, इसरु उडाना, जेफ्री व्हॅंडरसे.

Leave A Reply

Your email address will not be published.