कराड – करोनामुळे 2020 मध्ये कडक लॉकडाऊन असताना रेकॉर्डवरील आरोपी शीतल गोरख काळे (वय 40, ओगलेवाडी, ता. कराड) याने विद्यानगर येथे रात्री एका घरातील 70 वर्षीय महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले होते. त्याला न्यायालयाने शुक्रवारी एक वर्ष कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या गुन्हाचा तपास सपोनि विजय गोडसे, हवालदार काटवटे, पोलीस नाईक संजय जाधव, विनोद माने यांनी केला होता. आरोपीला अटक करुन त्याच्याकडून मंगळसूत्र जप्त केले.
त्याच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र सादर केले. या खटल्याची सुनावणी अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयात झाली. सरकार पक्षाच्यावतीने ऍड. शीला नाईक यांनी केलेला युक्तिवाद व पोलिसांनी सादर केलेले पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली.