नवी दिल्ली : उत्तराखंड सरकारमधील माजी मंत्री राजेंद्र बहुगुणा यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बहुगुणा यांनी पाण्याच्या टाकीवर चढून गोळी झाडून आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बहुगुणा यांच्यावर नातीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता.
हल्दवानी सर्कल ऑफिसर (सीओ) भूपिंदर सिंग धोनी यांनी सांगितले की बहुगुणा यांच्या सुनेने त्यांच्यावर नातीचा विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्यावर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आत्महत्या करण्यापूर्वी बहुगुणा यांनी पोलिसांना बोलावले आणि नंतर पाण्याच्या टाकीवर चढून पिस्तुलाने गोळी झाडत आत्महत्या केली.आत्महत्येनंतर पोलिसांनी सुनेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
Ex-Uttarakhand Minister kills self after being booked for molesting granddaughter
Read @ANI Story | https://t.co/zWpcNocvfB#uttarakhandnews #RajendraBahuguna #pocso pic.twitter.com/rGl5L0xBfy
— ANI Digital (@ani_digital) May 27, 2022
पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले त्यावेळी बहुगुणा हे पाण्याच्या टाकीवर चढले होते. त्यानंतर पोलिसांनी बहुगुणा यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांना खाली येण्यास सांगितले. पण नंतर अचानक त्यांनी बंदूक घेतली आणि छातीत गोळी झाडली. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. त्यांना वाचवण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
बहुगुणा यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही, परंतु या मातीवरील लैंगिक प्रकरणामुळे आणि आरोपांमुळे ते अस्वस्थ होते. उत्तराखंड रोडवेज कर्मचारी बहुगुणा यांना २००२ मध्ये राज्याच्या पहिल्या निवडून आलेल्या सरकारमध्ये राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला होता.