मकरसंक्रांत आणि तीळगूळ

भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाचे विशेष असे महत्त्व आहे. त्यापैकीच एक सण म्हणजे मकर संक्रांत. मकर संक्रांतीच्या निमित्ताने बनवले जाणारे तीळगुळ विशेष आरोग्यदायी आहे. तीळ व गूळ या दोन्हीमध्ये मूलतः उष्ण गुणधर्म असल्याने ऐन कडाक्‍याच्या थंडीत येणाऱ्या मकर संक्रांतीला तिळगूळ खाण्याची/वाटण्याची पध्दत असावी. तीळ व गुळ एकत्रितपणे सेवन केल्यामुळे हिवाळ्यात शरीराला उष्णता मिळते.

तीळ व गुळामध्ये भरपूर प्रमाणात पोषणतत्वे आहेत. त्यातल्या त्यात तीळ हे पोषणतत्वांचा खजिनाच आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तीळ व गुळाचे अनेक औषधी उपयोगही आहेत. आयुर्वेदात तीळ व गूळ हे बलवर्धक मानण्यात आले आहे. व अनेक व्याधींच्या उपचारासाठी तीळ व गुळाचा उपयोग केला जातो…संशोधनानुसार तीळामधील विशिष्ट अँटी ऑक्‍सीडन्ट्‌स कॅन्सरच्या पेशींची वाढ रोखण्याचे कार्य करतात. यामुळे अनेक प्रकारच्या कॅन्सर पासून बचाव होऊ शकतो.

मजबूत हाडे व दात
तीळ व गुळ यामध्ये भरपूर कॅल्शियम असल्यामुळे हाडे, दात व हिरड्यांना मजबूती येते.

इतर उपयोग
दैनंदिन आहारात डाळींबरोबरच तीळाचा समावेश केला तर शरीराला आवश्‍यक ती सर्व ऍमिनो आम्ले मिळण्यास मदत होते. विशेषतः लहान मुलांच्या वाढीसाठी प्रथिने आवश्‍यक असतात. तीळामध्ये भरपूर प्रमाणात चोथा किंवा तंतुमय पदार्थ असल्यामुळे तीळ मुळव्याधीवरही गुणकारी आहेत. तीळ व गुळामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हिमोग्लोबिन लेवल वाढवण्यासाठी तिळगूळ उपयुक्त आहेत.
तीळ व गुळाचे आरोग्यास अनेक फायदे असताना तीळ गुळाची जागा रंगीबेरंगी हलव्याने घेतलेली दिसत आहे. रंगीत तिळगुळापासून आपल्या शरीराला कुठलीही पोषणतत्वे मिळत नाहीत तर फक्त एम्टी कॅलरीज मिळतात. तर मग या मकर संक्रांतीला आपण सर्वांनी पोषणयुक्त असे तीळगूळच बनवावे.
डॉ. प्रियदर्शनी देशमुख कृषि विज्ञान केंद्र, कालवडे

निरोगी हृदयासाठी
तीळामध्ये असलेली पोषणतत्वे: कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, झिंक आणि सेलेनियम हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. तीळामध्ये भरपूर प्रमाणात असलेले मॅग्नेशियम विशेषतः रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. त्यामुळे संभाव्य हार्टअटॅकचा धोका टळतो किंवा बऱ्याच प्रमाणात कमी होतो. तीळामध्ये असलेले विशिष्ट फायटोन्युट्रीएनट्‍र्स शरीरातील कोलेस्टेरोल लेवल कमी करण्यासाठी मदत करतात. तीळामध्ये असणारी विविध अँटीऑक्‍सीडन्ट्‌स हे शरीरातील चांगल्या कोलेस्टेरोलचे प्रमाण वाढवून बॅड कोलेस्टेरोलचे प्रमाण कमी करण्यास मदत करते.

सौंदर्यवर्धक
तीळ व गूळ हे दोन्ही पदार्थ सौंदर्यवर्धक आहेत. विशेषतः केस व त्वचेच्या सौंदर्यासाठी या दोन्हींचा उपयोग होतो. सनबर्न, त्वचेवरील सुरकुत्या इत्यादी मध्येही तीळाच्या तेलाचा खास औषधी म्हणून उपयोग केला जातो. तिळातील अँटीऑक्‍सीडन्ट्‌स हे सूर्यकिरणांमधील यू. व्ही. लाइटपासून त्वचेचे संरक्षण करतात. तीळाचे तेल, हळद व दूध याचे मिश्रण चेहऱ्याला लावल्यास पिंपल्स निघून जातात व त्वचाही मुलायम होते. नियमितपणे थोड्या प्रमाणात तीळ खाल्ले किंवा तिळाच्या तेलाचा वापर केला तर केसांचे आरोग्यही सुधारते व केस गळती आटोक्‍यात येते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)