loksabha election 2024 | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेजस्वी यादव मासे खात असल्याच्या व्हिडिओवरून हल्लाबोल केला आहे. पीएम मोदी म्हणाले होते,‘नवरात्रीत हा व्हिडिओ दाखवून तुम्ही कोणाला खुश करत आहात? असाही प्रश्न विचारला होता.
जम्मू-काश्मीरमधील उधमपूर येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की होते, ‘काही लोकांना जनभावनांशी काहीही देणेघेणे नाही. त्यांना लोकांच्या भावनांशी खेळण्यात मजा येते.’ असं म्हणत मोदींनी तेजस्वी यादव यांच्यावर टीका केली होती. RJD नेते तेजस्वी यादव यांनी मासे खाल्ल्यानंतर आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर गदारोळ सुरू आहे. अशात आता इंडिया आघाडीकडून प्रतिक्रिया येत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री यांनीही यावरून भाजप पक्षावर टीका केली आहे.
loksabha election 2024 | नेमकं काय म्हणाल्या ममता बॅनर्जी
सध्याच्या सरकारला सत्तेवरून बेदखल न केल्यास लोकशाही धोक्यात येईल, भाजप सत्तेत आल्यास लोकांच्या खाण्यापिण्याच्या आणि झोपण्याच्या सवयी ठरवेल.तुम्ही काय खाणार हे ते (भाजप) ठरवतील; भाजप तुम्हाला सकाळच्या चहासोबत ‘गोमूत्र’ प्यायला आणि दुपारच्या जेवणात ‘गोबर’ खाण्यास सांगेल. तुमच्या जीवनातील प्रत्येक पैलूवर नियंत्रण ठेवणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.
कूचबिहारमधील सभेला संबोधित करताना ममता यांनी दावा केला की, ‘देशाच्या स्वातंत्र्याचे रक्षण करायचे असेल तर भाजपला हटवा, तरच देश स्वतंत्र राहील, असा दावाही त्यांनी केला आहे. . हा पक्ष निवडणुकीत जिंकला तर भविष्यात देशात निवडणुका होणार नाहीत. त्यांना देशात एक नेता, एक राष्ट्र, एक भाषण आणि एक अन्न हवे आहे. 17 एप्रिलला रामनवमीच्या मुहूर्तावर भाजप हिंसाचार आणि दंगली भडकवण्याचा प्रयत्न करेल, असा आरोपही ममता यांनी केला.
हे वाचाल का ? ‘उमेदवारी मागे घेण्यास तयार, पण…’ – चंद्रहार पाटील