Lok Sabha Election 2024 | महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसांपासून लोकसभेच्या जागावाटपावरून खटके उडत असल्याचे दिसत होते. काही जागांवर एकापेक्षा अधिक पक्षांनी दावा केल्याने महाविकास आघाडीतील तिढा सुटणार का? असा प्रश्न उपस्थित झाला होता.
तुतारीच्या साथीने महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत अधिक बुलंद करण्यासाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाने लोकसभा निवडणूक २०२४ ची तिसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. चला, आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सोबतीने सेवा-सन्मान आणि… pic.twitter.com/XUHuXOh88P
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) April 10, 2024
मात्र माहाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी एकत्र येत जागावाटपाचा वाद अखेर सोडवला आहे. याबाबत महाविकास आघाडीतर्फे एक पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते, संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर केले. यामध्ये शिवसेना 21, राष्ट्रवादी काँग्रेस 10 आणि काँग्रेस 17 जागांवर निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अशात राष्ट्रवादी काँग्रेस 10 जागा मधील २ जागांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज शरद पवार गटाकडून साताऱ्यातून शशिकांत शिंदेंना आणि रावेरमधून श्रीराम पाटील यांना तिकीट देण्यात आले. मात्र, माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा मात्र अद्याप कायम आहे.
बारामती – सुप्रिया सुळे
शिरूर – डॉ. अमोल कोल्हे
सातारा -शशिकांत शिंदे
भिवंडी -सुरेश म्हात्रे
दिंडोरी -भास्करराव भगरे
माढा -राष्ट्रवादी -उमेदवार घोषणा नाही
रावेर – श्रीराम पाटील
वर्धा – अमर काळे
अहमदनगर – निलेश लंके
बीड – बजरंग सोनवणे