नवी दिल्ली – एप्रिल ते जून या तीन महिन्यांमध्ये लॉकडाऊनमुळे पुण्यासह मोठ्या आठ शहरांमध्ये घर विक्री 79 टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा या क्षेत्रातील माहिती संकलित करणाऱ्या प्रॉप टायगर या संस्थेने केला आहे.
या अगोदर नाईट फ्रॅंक या संस्थेनेही असाच दावा केला होता. या तिमाहीत पुणे, मुंबई.दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू, अहमदाबाद या राज्यातील घर विक्रीवर परिणाम झाला. तीन महिन्यांत पुण्यातील घर विक्री 74 टक्क्यांनी कमी होऊन या काळात 4,908 घरे विकली गेली.
गेल्या वर्षी या कालावधीमध्ये पुण्यामध्ये 18,581 घरे विकली गेली होती. नागरिक भांडवलाचे संवर्धन करण्याच्या मनःस्थितीत आहेत त्यामुळे मोठी खरेदी करीत नाहीत, असे अहवालात म्हटले आहे.