पावसाने वीज गायब; मेणबत्ती लावून मतदानाची प्रक्रिया सुरू

पुणे – शहर व परिसरात मागील दोन दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत आहे. या पावसाने शहर व उपनगरातील अनेक भागांत वीज गायब झाली असल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे. त्यातच शिवाजीनगर येथील विद्याभवन शाळेत रात्रीपासून वीज गायब आहे. अशातच मेणबत्ती लावून मतदानाची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

गेल्या दोन दिवसांपासून शहर व उपनगरात पाऊस सुरू आहे. यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील काही ठिकाणी तर, उपनगरांतील कात्रज, कोंढवा, विश्रांतवाडी, धानोरी आदी भागांतील वीज शनिवारी रात्रीपासून बंद आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.